ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची ५४ वी वार्षिक
सर्वसाधारण सभा (शनिवार दिनांक १७ मे) कै. अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप उपस्थित होते. शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या अध्येक्षतेखाली संस्थेचे संचालक मंडळ व सल्लागार मंडळ यांच्या उपस्थित पार पडली.
या सभेला मोठ्या प्रमाणावर सभासद उपस्थित होते. मा. अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे सर्व विषय सचिव योगेश रानवडे यांनी वाचून दाखविले व सदर सर्व विषयांस सभेस उपस्थित सभासदांनी बहुमताने व एकविचाराने मंजुरी दिलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने सभासदांना १२% दराप्रमाणे लाभांश मंजुर करण्यात आला व सभेला उपस्थित असणाऱ्या सभासदांना सभा भत्ता म्हणून र.रु.५००/- अदा करण्यास बहुमतांनी मंजूरी देण्यात आली.
तसेच सेवानिवृत्त व सलग २५ वर्ष सभासदांना रु.५०००/- बक्षिस म्हणून अदा करण्यात आली आहे शाल व स्मृती चिन्ह देवून सन्मानित करणेत आले. व
सभासदांच्या गुणवंत पाल्यांना व राज्य स्तरीय खेळाडूंना व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विराज विष्णु लांडगे यांना स्मृती चिन्ह देवून सन्मानित करणेत आले.
यावेळी संस्थेच्या चेअरमन चारुशिला जोशी, व्हा. चेअरमन विजय नलावडे, सचिव योगेश रानवडे,
खजिनदार विशाल भुजबळ संचालक सनी कदम, नथा मातेरे, विश्वनाथ लांडगे, भास्कर फडतरे, ज्ञानेश्वर शिंदे, चंद्रकांत भोईर, शिवाजी येळवंडे, वैभव देवकर, विजय मुंडे, कृष्णा पारगे, विजया कांबळे, अनिल लखन, संदीप कापसे, अभिषेक फुगे, गणेश गवळी, युनूस पगडीवाले तसेच सल्लागार मनोज माछरे, नितीन समगीर, दिगंबर चिंचवडे, महादेव बोत्रे, धर्मेंद्र शिंदे, संजय कापसे, नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, उमेश बांदल, विशाल बाणेकर, दत्तात्रय ढगे, चंद्रशेखर गावडे, तुषार कस्पटे, सुरज टिंगरे, प्रमोद अंबपकर, मदन चिंचवडे, किसन आरजे, देवराम जगदाळे, सुहास ताकवले आदी उपस्थित होते. सदर सभेचे स्वागत मनोज माछरे यांनी केले.
प्रास्ताविक व आभार प्रदर्शन चेअरमन चारुशिला जोशी व सूत्रसंचालन विश्वनाथ लांडगे, कृष्णा पारगे
यांनी केले.









