ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पीसीईटीच्या पायाभूत सुविधा – ज्ञानेश्वर लांडगे
झोनल कुस्ती स्पर्धेचे यजमानपद पीसीपीला, १२ तंत्रनिकेतन महाविद्यालयांचा सहभाग

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने केजी टू पीएचडी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडणघडण होत असताना त्यांचा शारीरिक व मानसिक विकास देखील उत्कृष्ट व्हावा यासाठी पीसीईटीच्या सर्व शाखांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत क्रीडा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुस्ती स्पर्धेचे यजमानपद पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन विद्यालयाला मिळणे कौतुकास्पद आहे असे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले.
इंटर इंजिनियरींग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्टस् असोसिएशन च्या वतीने आयोजित डी-१ झोनल कुस्ती स्पर्धेचे यजमानपद पिंपरी चिंचवड पाॅलीटेक्निकने भुषविले. भोसरी येथील पै. मारुतीराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र येथे आयोजित केलेल्या या स्पर्धांचे उद्घाटन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पहिली कुस्ती लावण्यात आली. यावेळी उद्योजक नरेंद्र लांडगे, प्राचार्य डाॅ. विद्या बॅकाॅड, अनुजा कामठे, भारती भसे, गौरी जाधव, गायत्री जगताप, सदाशिव लांडगे, रुपेश पवार, सोमनाथ खेडेकर, एम. एम. शेख, कुस्ती पंच, मार्गदर्शक व विविध १२ तंत्र तंत्रनिकेतन विद्यालयातील सहभागी खेळाडू उपस्थित होते.
५७ किलो, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ९७ आणि १२५ किलो वजनी गटातील मॅट वरील कुस्त्या घेण्यात आल्या. विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना नगरसेवक ॲड. नितिन लांडगे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी नगरसेवक अमित गावडे, पवना सहकारी बँकेचे संचालक जयनाथ काटे, सामाजिक कार्यकर्ते संतोष महाराज लांडगे, निवृत्ती लांडगे, सुरेश लांडगे, राजेंद्र लांडगे, संतोष माचुत्रे, प्राचार्य डाॅ. विद्या बॅकाॅड आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे : ५७ किलो वजनी गटात राजर्षी शाहु तंत्रनिकेतन, ताथवडे च्या श्रेयस शिंदे याने झिल तंत्रनिकेतन च्या प्रणव वीर चा पराभव केला. ६१ किलो वजनी गटात झिल तंत्रनिकेतन चा अभिमन्यू बानगुडे याने जयहिंद तंत्रनिकेतनच्या ओम मोरे ला चितपट केले. तर ६५ किलो वजनी गटामध्ये झिल तंत्रनिकेतनच्या आदित्य भारेकर याने समर्थ तंत्रनिकेतनच्या आयुष रोकडे वर विजय मिळवला. ७० किलो वजनी गटात भिवराबाई सावंत तंत्रनिकेतनच्या खेळाडूंमध्ये लढत झाली. यामध्ये किरण कोळपे याने सागर घोरपडे वर विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ७४ किलो वजनी गटात झिल तंत्रनिकेतनच्या विश्वजित तोरवे ने पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतनच्या दुर्वांकुर लांडगे चा पराभव केला. तसेच ८६ किलो वजनी गटात राजगड तंत्रनिकेतनच्या दोन खेळाडूंमध्ये लक्षवेधी लढत झाली या लढतीत धिरज सारक याने आयुष वीर चा पराभव केला. ९७ किलो वजनी गटात पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतनच्या विकुल सांगोले याने झिल तंत्रनिकेतनच्या समीर खुटवड चा पराभव केला. १२५ किलो वजनी गटात भिवराबाई सांवंत तंत्रनिकेतनच्या करण ठोंबरे याने कुस्त्रो वाडिया तंत्रनिकेतनच्या आनंद वाघमारे याच्यावर मात करून प्रथम क्रमांक पटकावला.
पीसीपीचे क्रिडा प्रभारी सुनील जगताप, किशोर गव्हाणे, लक्ष्मी थरकुडे यांनी प्राचार्य डाॅ. विद्या बॅकाॅड यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे संयोजन केले. कुस्ती पंच म्हणून विजय कुटे, विशाल मोहिते यांनी आणि संघ व्यवस्थापक राहुल पवार, योगेश ठाकरे यांनी काम पाहिले. सर्व विजेत्या खेळाडूंचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.




















