ताज्या घडामोडीपिंपरी

पीसीसीओईआरला स्वायत्तता म्हणजे स्वतंत्र ओळख- ज्ञानेश्वर लांडगे

पीसीसीओईआरमध्ये नियामक मंडळाची पहिली बैठक संपन्न

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्रात जागतिक पातळीवर अभिमानाने नाव घेतले जाते. या ट्रस्ट अंतर्गत रावेत येथे २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) या महाविद्यालयाने अल्पावधीतच स्वायत्तता मिळवली आहे. आता हे महाविद्यालय स्वतंत्र ओळख निर्माण करून आणखी तांत्रिक कुशल मनुष्यबळ करेल असा विश्वास पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी बैठकीत व्यक्त केला.

पीसीईटीच्या रावेत येथील पीसीसीओईआर मध्ये नियामक मंडळाची २०२५- २६ या शैक्षणिक वर्षाची पहिली बैठक संपन्न झाली.
यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, विशेष निमंत्रित शिक्षण तज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर तसेच प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, श्रीकांत पाटील, डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. राहुल मापारी आदी उपस्थित होते.

लांडगे यांनी सांगितले की, या महाविद्यालयात कॉम्प्युटर, आयटी, इ अँड टीसी, मेकॅनिकल, सिव्हिल या अभियांत्रिकीच्या पदवीसह बीबीए आणि बीसीए एक कोर्स शिकवले जातात. आतापर्यंत २५०० पेक्षा जास्त अभियंते येथे घडले आहेत आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच परदेशात कार्यरत आहेत. येथे विद्यार्थ्यांसाठी अध्यायावत उच्च तंत्रज्ञान नियुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच बहुतांशी प्राध्यापकांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.
पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी कृती अहवाल सादर केला. या अहवालात कॉलेजला मिळालेले “नॅक ए प्लस प्लस” मानांकन, युजीसीचे एनबीए मानांकन आणि आयएसओ प्रमाणपत्र, शैक्षणिक स्वायत्तता याचा समावेश होता. तसेच संशोधन प्रकाशन, उद्योग प्रायोजित प्रयोगशाळांना प्रोत्साहन, सल्लागार आणि निधी प्रकल्पांचे प्रमाण, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, उद्योजकता सुधारणे यासारख्या विषयांवर २०२५ – २०३० च्या धोरणात्मक सादरीकरण करण्यात आले.

या बैठकीत नियामक मंडळाकडून स्वायत्तेखाली शैक्षणिक परिषद, अभ्यास मंडळ, परीक्षा मंडळ, वित्त समिती, आयक्यूएसी इतर शैक्षणिक सुविधा व सुधारणा अशा वैधानिक समित्यांच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रादेशिक आव्हानांना सामोरे जावे असे प्रा. डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
उद्योग संस्थाच्या मदतीने आणि एआय वर आधारित नवीन तंत्रज्ञानाच्या सहकार्याने नवनवीन विकास उपक्रम सुरू केले आहेत त्याचे प्रा. डॉ. प्रफुल पवार यांनी समर्थन केले.
ट्रेन द ट्रेनर या कार्यक्रमाला श्रीकांत पाटील यांनी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
उपसंचालक डॉ. राहुल मापारी यांनी स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button