ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजामाता रुग्णालयात भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्य पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा सामाजिक उपक्रम संपन्न झाला. भाजप पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम समाजसेवेचा संदेश देणारा ठरला.

हा उपक्रम भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वात पार पडला. भाजप ओबीसी VJNT आघाडी अध्यक्ष गणेश ढाकणे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (भटके विमुक्त) कैलास सानप यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णांना फळांचे वाटप केले. त्यांच्या उपस्थितीने रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी, काटे म्हणाले की, “पंकजाताई मुंडे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे ही आमची जबाबदारी आहे. या फळवाटपातून रुग्णांना थोडा दिलासा मिळेल, त्यांना शुभेच्छा देण्याचा हा प्रयत्न आहे.”

या उपक्रमात भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, पिंपरी/दापोडी/बोपखेल मंडल अध्यक्ष अनिता गणेश वाळुंजकर, नरेश पंजाबी, मनीष पंजाबी, चिंचवड/काळेवाडी मंडल आध्यक्ष हर्षद नढे, रहाटणी पिंपळे सौदागर मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, मनोज ब्राम्हणकर, जयेश चौधरी, गणेश वाळुंजकर, दीपक नागरगोजे, डॉ. नारायण जायभाय, रेखाताई काटे, मीनाक्षी गायकवाड, अमोल नागरगोजे, रवी बांगर, प्रकाश लोहार, चंदन केदार, ओम प्रकाश शर्मा, मनोज तोरडमल, खंडू कटारे, दत्ताभाऊ ढगे, हनुमंत रामनाथ घुगे, चंदन केदार, शुभम पालवे, सोनू पालवे, मारुती पालवे, उद्धव खेडकर, भागवत खेडकर, अमित कुदळे, गुलाबराव मारणे यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णालय प्रशासनाने या उपक्रमाचे स्वागत करत आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button