चिंचवड येथील ओरिएंटल मार्व्हल सोसायटी गणेशोत्सव निमित्त सलग ११ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओरिएंटल मार्व्हल सोसायटी तर्फे गणेशोत्सव निमित्त रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमास महिला व पुरुषांनी भरगोस प्रतिसाद देऊन १५३ बॅगचे रक्त संकलन झाले.
गणेशोत्सवा निमित्त आज पर्यंतच्या झालेल्या रक्तदानाच्या जास्तीच्या बाटल्यांचे रक्तदानाचे उद्दिष्ट साध्य झाले. संजीवनी रक्तपेढी यांच्या साहाय्याने हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. यंदाचे रक्तदान शिबिराचे हे सलग ११ वे वर्षे आहे, या शिबिरात अठरा वर्ष पूर्ण झालेले युवक व युवतींनी देखील विशेषता रक्तदान केले, तसेच काही कुटुंबांनी एकत्रित रित्या रक्तदान केले. यामध्ये सोसायटी चे अध्यक्ष- विशाल कुलकर्णी, सचिव – साकेत भलगट, खजिनदार- चंद्रशेखर शिरसागर , संतोष पाटील, सुनिल कांदळकर, अभिजीत बाबर, वरून कुलकर्णी, श्याम कापरे, सुभाष जोशी, अभिजीत मांगले, हेमंत देशमुख, मनोज सग्रि, राजन पाटील, मारुती पाटील, योगेश लंके, अमित भिसे, प्रशांत पाटील, प्रमोद चौगुले, हेमंत देशमुख, बिपिन गारे व सोसायटी मधील सदस्य तसेच ओम निसर्ग मंडळ व विशेष सहकार्य श्याम कापरे यांचे लाभले.














