ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवडमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांची निर्णायक बैठक; आरक्षित जागांवर ‘मूळ ओबीसी’ उमेदवारीची एकमुखी मागणी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात ओबीसी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज संपन्न झाली. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील ओबीसींच्या राजकीय हक्क आणि प्रतिनिधित्वासंदर्भात या बैठकीत रणनीती आखण्यात आली.

बैठकीत ओबीसी नेते राजाराम पाटील, अॅड. मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, पुंडलिक सैदाने, विद्याधर मानकर, आनंदा कुदळे, नकुल महाजन यांनी मार्गदर्शन केले.

अॅड. मंगेश ससाणे यांनी सांगितले की,
“शहरातील सर्व राजकीय पक्षांना लेखी निवेदन देऊन आरक्षित जागांवर मूळ ओबीसी उमेदवारांनाच संधी द्यावी अशी मागणी केली जाईल. मागणी मान्य न झाल्यास ओबीसी समाज स्वतंत्रपणे सर्व जागांवर निवडणूक लढण्यास सज्ज आहे.”

तर राजाराम पाटील यांनी ओबीसी मतदारांना आवाहन केले की,“आरक्षित जागांवर मूळ ओबीसींनाच मतदान करून समाजाचे नेतृत्व स्वतःकडे ठेवावे.”

मृणाल ढोले पाटील यांनी ओबीसींचे आरक्षण कसे खोट्या कुणबी दाखल्यांमुळे आणि प्रस्थापित सत्ताकेंद्रांमुळे बाधित झाले, याविषयी सविस्तर माहिती दिली.

बैठकीत शहरस्तरीय ओबीसी कार्यकर्ता मेळावा मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन कृती समितीचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, पदाधिकारी माऊली बोराटे, वैजनाथ शिरसाट, राहुल मदने, शंकर लोंढे, सुहास कुदळे, लहु अनारसे, सागर बनसोडे, शिवहार काळे, महेश भागवत, राजकुमार परदेशी यांनी केले.सूत्रसंचालन  अजित चौगुले  यांनी केले.तर आभार  माऊली बोराटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button