नोटरींनी कामांमध्ये शिस्तबद्धता व कायद्याचे काटेकोर पालन करणे अपेक्षित- न्यायमूर्ती प्रसन्न वराळे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड, पुणे येथे (शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी) महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने “५वी नोटरी परिषद २०२५”संपन्न झाली . परिषदेची सुरुवात संविधान दिंडीने झाली या दिंडीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सामील झाले.
या नोटरी परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती संदीप.व्ही. मारणे, न्यायमूर्ती आरिफ एस.डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे एस.के.महाजन, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे,ॲड.राजेंद्र उमाप ( मा चेअरमन ) आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी न्यायमूर्ती वराळे म्हणाले की.नोटरींचे कार्य हे नोबल असून नोटरींनी त्यांच्या कामामध्ये शिस्तबद्धता व कायद्याचे काटेकोर पालन करणे अभिप्रेत आहे तसेच बदलत्या काळात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चा वापर जागरूकपणे करणे अपेक्षित आहे तसेच नोटरी फी मध्ये काळानुसार वाढ होणे योग्य ठरेल असे मत व्यक्त केले.न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे मॅडम म्हणाल्या की नवोदित नोटरींना भविष्यकाळात कोणत्याही कायदेशीर कारवाईस सामोरे जाऊ लागू नये म्हणून नोटरींच्या कार्यशाळा वेळोवेळी होणे अपेक्षित आहे. बदलत्या काळात ऑनलाइन डिजिटल नोटरी वर्क बाबत सज्ज राहावे.नोटरींनी त्यांच्या कामामध्ये नैतिकता ठेवून काम करणे आवश्यक आहे.
या परिषदेमध्ये वरिष्ठ नोटरी व कायदेविषयक योगदान देणाऱ्या ज्येष्ठ वकिलांचे सत्कार करण्यात आले तसेच या ऐतिहासिक परिषदेच्या माध्यमातून नोटरी पदाचा दर्जा,व्यावसायिक सक्षमता व तांत्रिक सुधारणा यावर अनेक ज्येष्ठ वकिलांनी मार्गदर्शन केले. नोटरी कायदा व त्यासंबंधी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे यावर चर्चा करण्यात आली. या शरीर परिषदेमध्ये खालील ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले. .. वकिलांचे नोटरी सर्टिफिकेट व रिन्यूअल याबाबत विलंब होत आहे ते ताबडतोब मिळावेत म्हणून शासनाकडे पाठपुरावा करणे. शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये नोटरी वकिलांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे. फसव्या फौजदारी तक्रारी च्या माध्यमातून नोटरी वकिलांना पोलीस कारवाईस सामोरे जावे लागते . पोलिसांनी नोटरी अॅक्ट मधील कलम 13 अंतर्गत नोटरी यांना जे संरक्षण दिलेले आहे यास बाधा येणार नाही याची दक्षता घेणेबाबत शासनाकडून परिपत्रक निघणे बाबत पाठपुरावा करणे. वकील संरक्षण कायदा मंजूर करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे .तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे होणे बाबत महाराष्ट्र गोवा असोसिएशनचा जाहीर पाठिंबा देण्यात आला. शासनाने नोटरी वकिलांना ओळखपत्र देणे. वकिलांना टोलमाफी मिळाली पाहिजे, इन्शुरन्स फॅसिलिटी, खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नये, नोटरीना न्यायालयच्या आवारात बसण्यासाठी हक्काची जागा असे ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातून 15 नोटरी वकिलांना विधी सेवा पुरस्कार माननीय न्यायमूर्ती व विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यामध्ये ॲड राजेंद्र देशमुख ( छत्रपती संभाजीनगर )
पुण्यामधून पुरस्कार मिळालेले नोटरी ॲड.गोरक्षनाथ काळे, ॲड. पांडुरंग थोरवे,ॲड.संजय दातीर पाटील, माजी न्यायाधीश श्री. हाजी सय्यद अजमत अली( नांदेड),ॲड.रवी गायकवाड (परभणी),ॲड.अशोक ठाकरे ( छत्रपती संभाजीनगर)या परिषदेला राज्यभरातून एक हजार पेक्षा जास्त संख्येने नोटरी वकील बंधू भगिनी उपस्थित होते.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली यांनी प्रास्तावित व स्वागत केले . नोटरी बंधू-भगिनींसाठी संघटनेचे सुरक्षा कवच कायम राहील अशी ग्वाही प्रदेश अध्यक्ष अडवोकेट सय्यद सिकंदर यांनी आली यांनी दिली. कार्याध्यक्ष ॲड. यशवंत खराडे यांनी , संघटनेचे उद्दिष्ट व कार्यपद्धती व मागील काळात केलेल्या कामाचा आढावा घेतला. याबद्दल सविस्तर विवेचन केले सेक्रेटरी ॲड.प्रविण नलवडे यांनी परिषदेचे दुसरे सत्रामध्ये नोटरी कायदा व नोटरी प्रॅक्टिस व प्रोसिजर यावर मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट सुमतीलाल बलदोटा, ॲडव्होकेट ललवाणी यांनी या सत्रात नवोदित नोटरी वकिलांना मार्गदर्शन करून अडीअडचणी प्रसंगी मदतीस सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांचा देखील स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. परिषदेसाठी नाष्टा व जेवणाची व्यवस्था आमदार श्री महेश दादा लांडगे यांच्याकडून करण्यात आली. तसेच संघटनेला नेहमी मदत करणारे खासदार श्री. श्रीरंग अप्पा बारणे यांचेही संघटनेच्या वतीने आभार मानले.परिषदेचे कार्यवाह ॲड.आतिश लांडगे. एडवोकेट रामराजे भोसले महिला अध्यक्ष ॲड.शोभा कड ॲड.महिला सचिव ॲड .ज्योती पांडे ॲड. आशिष ताम्हाणे, ॲडव्होकेट कल्याण शिंदे मराठवाडा विभागीय अध्यक्ष एडवोकेट एम . ए.सईद वगैरे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले .सूत्रसंचालन ॲड. आस्मा शेख तर आभार प्रदर्शन ॲड.अतिश लांडगे यांनी केले.








