ताज्या घडामोडीपिंपरी

घरकुल परिसरात निशा यादव यांचा घरोघरी प्रचार

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विजयाची पोचपावती

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक 11 मधील घरकुल परिसरात इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखाली आज घरोघरी प्रचार अभियान राबविण्यात आले. या प्रचारादरम्यान नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत निशा यादव यांना भरभरून पाठिंबा दिला. नागरिकांचा वाढता प्रतिसाद हा त्यांच्या विजयाची पोचपावती देणारा ठरत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

प्रचारादरम्यान निशा यादव यांनी घराघरांत भेटी देत नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. परिसरातील महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी निशा यादव यांचे मनापासून स्वागत करत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. अनेक ठिकाणी माता भगिनींकडून औक्षण करण्यात आले तर ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले.

घरकुल परिसरातील महिला वर्गाने विशेषतः निशा यादव यांच्या सामाजिक कार्याची आणि महिलांसाठीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची प्रशंसा केली. “महिलांचे प्रश्न समजून घेणारे आणि ते सोडवण्यासाठी कटिबद्ध असलेले नेतृत्व आम्हाला हवे आहे,” अशी भावना महिलांनी व्यक्त केली.

युवकांनीही मोठ्या संख्येने प्रचारात सहभाग घेत विकास, रोजगार आणि मूलभूत सुविधांबाबत अपेक्षा मांडल्या. ज्येष्ठ नागरिकांनीदेखील यापूर्वी मिळालेल्या सहकार्याचा उल्लेख करत आगामी काळात महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी बोलताना निशा दिनेश यादव म्हणाल्या,“नागरिकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. घरकुल परिसरातील नागरिकांनी दिलेला प्रेमळ प्रतिसाद माझे मनोबल वाढवणारा आहे. प्रभागातील आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, वाहतूक आणि मूलभूत सुविधांसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभावी काम करणार आहे. नागरिकांनी दिलेला विश्वास निश्चितच सार्थ ठरवू.”

घरकुल परिसरातील या प्रचारातून नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा वाढता विश्वास स्पष्टपणे दिसून आला. हे चित्र विजयाच्या दिशेने आशादायक ठरत आहे.

निशा दिनेश यादव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button