दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अनाथ मुलांना अन्नदान व साहित्य वाटप, निखिल दळवी यांचा सामाजिक उपक्रम

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत नगरसेवक जावेद रमजान शेख यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण म्हणून अनाथ मुलांना शिक्षण साहित्य व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम अन्नदान पुनरुस्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळा, चिंचवडगाव येथे पार पडला.
या प्रसंगी जावेद शेख यांची पत्नी फाहमिद जावेद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना उपशहरप्रमुख निखिल दळवी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात गोविंदराव शिंदे, सोमनाथ काळभोर, ताहीर जावेद शेख, कृष्णा माने आणि यज्ञेश वाघमारे यांच्या हस्ते अनाथ विद्यार्थ्यांना अन्नदान व साहित्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे जावेद शेख यांचे समाजसेवा कार्य आजही जिवंत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. समाजासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून, त्यांची स्मृती अशा सेवाकार्यातून जपली जात आहे.















