जुन्या-नव्या गाण्यांचा जल्लोष “आनंद-यात्री”त अनुभवला

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात नुकताच पार पडलेला “आनंद-यात्री” हा सुरेल संगीत कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि संगीतप्रेमींनी भरलेल्या सभागृहात संपन्न झाला.
डॉ. अविनाश देविदास देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात १९६० ते १९९० दरम्यानच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट तसेच रंगीत चित्रपटांतील गाण्यांचा मोहक संगम रसिकांनी अनुभवला. एकूण 29 गाण्यांचे नृत्यासह सादरीकरण करण्यात आले. १५ हून अधिक गायकांनी आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.आमदार उमा खापरे यांच्या उपस्थिती कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे निवेदन मयुर देशमुख आणि रुपाली यांनी त्यांच्या खास शैलीत केले, तर व्हिडिओ-व्हिज्युअल्सची भव्य सजावट विक्रम क्रिएशन्सने, आणि ध्वनीव्यवस्था राजेंद्र किरवे यांनी अतिशय सुंदर रीतीने सांभाळली.
या सुरेल मैफलीत डॉ. अविनाश देशपांडे यांच्यासह खालील कलाकारांनी आपल्या गायनाने रसिकांची मने जिंकली:
राजेंद्र, डॉ. सुमेध, डॉ. प्रशांत, डॉ. संजय, श्रीकांत, सी.ए. विनोद, डॉ. भूषण, डॉ रत्नाकर, राजेश, रसिक, राधिका, रसना, स्मिता, डॉ. जसप्रित, डॉ. बिजल, डॉ. सायली, डॉ. रोहिणी, रश्मी, एस, आदिती आणि स्वाती यांनी विविध भावस्पर्शी व सुमधुर गीतांची सादरीकरणे केली.
डॉ. अविनाश देशपांडे यांनी अध्यक्ष आणि गायक म्हणून सहभाग घेत “जुन्या आणि नव्या गाण्यांचा जल्लोष, एक अप्रतिम नजराणा” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमात उपस्थित रसिकांनी मनमुराद आनंद घेतला आणि आयोजकांचे कौतुक केले.
“जुन्या आणि नव्या गाण्यांचा जल्लोष, एक अप्रतिम नजराणा” या वाक्यांनुसार कार्यक्रमाची रंगत अनुभवता आली. संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते दहा वर्षाच्या प्रिन्सि या मुलीने सत्यम शिवम सुंदरम गीत तर तोष्णीवाल या अंध गायकाने गाणे गाऊन सर्वांची मने जिंकली
डॉ. देशपांडे यांनी आमदार उमा दीदी यांचा सत्कार केला व सर्वांचे आभार पण मानले.















