ताज्या घडामोडीपिंपरी
न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन अरुण चाबुकस्वार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेचे उपप्राचार्य सचिन कळसईत व तात्या शिनगारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचालन विद्यार्थिनी त्रिवेणी जाधव व स्वराली शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
शेवटी आभारप्रदर्शन विद्यार्थी सोहम गायकवाड याने केले. कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लाभली होती.














