ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेच्या न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये, राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि समाजक्रांतीचे प्रणेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार सर यांनी दोन्ही महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमावेळी उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अनिता पाटील, कल्पना चौधरी आणि चेतना देशमुख या शिक्षकांनी टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रबोधनपर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता रोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सारिका देशमुख यांनी केले.














