न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त माता-पित्यांचा व गुरुजनांचा सन्मान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रायझिंग स्टार प्री – स्कूल शाळेतील शिक्षिका राणी मोरे व शाळेतील पालक बबीता मटके यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे,दिशा कॉम्प्युटरच्या काजल वाघमारे प्रेरणा सोनी मॅडम व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या माता-पित्यांचा सन्मान करण्यात आला.
आई-वडील हे आपल्या आयुष्यातील पहिले गुरु असतात. त्यांचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी, माता-पित्यांचा विशेष सन्मान करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे महत्वाचे आहे तसेच गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.
गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुजनांच्या (शिक्षक, मार्गदर्शक) सन्मानासाठी असतो. या दिवशी, आपण आपल्या गुरुजनांना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. त्यांच्या शिकवणीतून आपल्याला जीवनात योग्य मार्ग मिळतो, म्हणून त्यांचे आभार मानणे महत्वाचे आहे. या निमित्ताने शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता पाचवीच्या सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गाणे गायले. तसेच अनिता रोडे व निशा पवार मॅडम यांनी “गुरुचे महत्त्व” याविषयी मुलांना मार्गदर्शन केले आणि पूजा गुप्ता, नम्रता सांवत,एजंल परिहार, सार्थक ननवरे या मुलांनी शिक्षकांविषयी माहिती सांगितली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया वाघ व शर्वरी काटे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुणाल भोजवाणी यांनी केले.













