ताज्या घडामोडीपिंपरी
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल घवघवीत यश

रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी येथील न्यू सिटी प्राइड इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल 97.00 टक्के लागला आहे. यात स्मित जडे याला 94.00 टक्के, रबजीत कौर रवींद्र सिंग राठौर हिला 91.00 टक्के, राहुल चौधरी याला 90.00 टक्के, प्राप्त केले आहेत. तर गुणवत्ता यादीमध्ये 54 मुलांनी विशेष प्राविण्य मिळवले.
विद्यार्थ्यांना यश मिळावे, यासाठी उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत आणि इयत्ता दहावीचे सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापिका रूपाली सोंडे यांनी केले. संस्थचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.













