ताज्या घडामोडीपिंपरी

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आनंदात व उत्साहात  ख्रिसमस साजरा

Spread the love

रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे ख्रिसमस दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वारशाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ८ वीतील संस्कार मटके व खुशबू सिंग यांनी अतिशय सुंदररीत्या केले. कार्यक्रमाची सुरुवात विशाखा खडे हिने सादर केलेल्या इंग्रजी भाषणाने झाली. त्यानंतर इयत्ता ९ वीतील श्रेया वाघ हिने प्रभावी हिंदी भाषण सादर केले.

इयत्ता पूर्व-प्राथमिक ते ९ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक व उत्साही नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सांता क्लॉज यांचे आगमन. सांता क्लॉजच्या प्रवेशावेळी विद्यार्थी आनंदाने नाचत होते व संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.

या कार्यक्रमात पालकांसाठी दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते — रांगोळी स्पर्धा व खाद्यपदार्थ स्पर्धा. पालकांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालक खूप आनंदी होते.

कार्यक्रमाच्या शेवटी नम्रता सावंत हिने सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व आयोजकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button