न्यू सिटी प्राइडमध्ये माजी नगरसेवक साहेबराव खरात यांना विनम्र अभिवादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये माजी नगरसेवक साहेबराव खरात यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते साहेबराव खरात यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले की, “बुद्धांनी दिलेले ज्ञान अंगीकारून साहेबराव खरात यांनी अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून धम्मक्रांती घडवली. साधी रहाणी व उच्च विचारसरणी ही त्यांची ओळख होती. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला. माणसावर माणूस म्हणून प्रेम करणारे, अन्यायाविरुद्ध झगडणारे, वंचितांच्या वेदना जाणून घेणारे व समाजाच्या उन्नतीसाठी सतत झटणारे असे साहेबराव खरात कोरोनाकाळात आपल्यातून गेले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना झाली.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा देवगिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन उर्मिला ठोंबरे यांनी केले.














