न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हर घर भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेच्या अंतर्गत संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.रॅलीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून झाली कोकणे चौक ते चालेंजर स्कूल ते लिनिअर गार्डन ते एन.सी.पी स्कूल ह्या मार्गाने रॅली काढण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे, संस्थेचे अध्यक्ष अरुण चाबुकस्वार, सी. पी. एस. स्कूलचे अनिता काटे, उन्नती फौंडेशनच्या कुंदा भिसे, पिंपळे सौदागर मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर , संदीप काटे, संजय भिसे, संदेश काटे, मनोज ब्राह्मणकर, दिनेश अवताडे, आबा पांढरे, सागर बिरारी, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत सर व अनेक प्रमुख मान्यवर उपस्तित होते. शहर भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते ध्वज फडकावून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.शाळेच्या बँड पथकाच्या तालावर विद्यार्थी अनुशासनबद्ध रचनेतून मार्गक्रमण करत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून एकात्मतेचा व देशभक्तीचा संदेश देण्यात आला. रॅली दरम्यान पर्यावरण संवर्धन, स्वच्छ भारत, महिला सशक्तीकरण, शिक्षणाचे महत्त्व अशा सामाजिक संदेशांचे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते.स्थानिक नागरिकांनी रॅलीचे स्वागत फुलांच्या वर्षावाने आणि टाळ्यांच्या गजरात केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वर्ग, शाळा समिती आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले.रॅलीच्या शेवटी देशभक्तीपर गाणी, भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उर्मिला ठोंबरे यांनी सर्वांचे आभार मानत देशभक्तीची भावना कायम जपण्याचे आवाहन केले.













