न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस शाळेचे शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार सर तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इयत्ता दहावीच्या व नववीच्या विशाखा खाडे , स्वराली शिंदे व मंथन जाधव या विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांच्या विषयी माहिती दिली. तसेच शाहू महाराजांच्या जीवनावरती पोवाडा गायला, उपस्थितना मार्गदर्शन करताना शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत म्हणाले; माणसांवर माणूस म्हणून प्रेम करणारे शाहू महाराज हे मोठ्या मनाचे राजे होते, सर्वसामान्य माणसाला राज्यात मान व विद्वान तसेच जगात सन्मान व कलाकार व विद्वानांना जगभरात स्थान देऊन महाराजांनी सर्वांना सन्मान मिळवून दिला अन्याच्या विरुद्ध झगडणारा पण वंचितांचे दुःख पाहून अश्रू ढळणारा दिन – दुबळ्यांच्या दुःखावर मायेची फुंकर घालणारा आणि समाजाच्या उन्नतीसाठी धडपडणारा जनतेचा लोकाभिमुख राजा, राजश्री शाहू महाराज यांचे कार्य व कर्तुत्वाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा पवार यांनी केले व आभार प्रदर्शन पूजा देवगिरी यांनी केले.













