Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- प्रभाग क्रमांक १७ (दळवीनगर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर) परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. मनीषा राजेश आरसुळ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

काल पार पडलेल्या या रॅलीदरम्यान परिसरातील हनुमान मंदिर, राम मंदिर तसेच शंकर मंदिर येथे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा संदेश दिला. ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेसप्रती आपला विश्वास व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक १७ हा महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी बनलेला कॅास्मोपॉलिटन मतदारसंघ मानला जातो. येथे खानदेश, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या विविधतेतूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि नेते अजितदादा पवार यांना मानणारा मतदारवर्ग मोठ्या संख्येने असल्याचे चित्र आहे.

या जनसमर्थनाचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. मनीषा आरसुळ यांना होत असून, प्रभागात त्यांच्या प्रचाराला चांगली गती मिळत आहे. विकासाभिमुख भूमिका, स्थानिक प्रश्नांची जाण आणि सर्वसमावेशक नेतृत्वामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, असे चित्र सध्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये पाहायला मिळत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version