ताज्या घडामोडीपिंपरी

नवयुग श्रावणी काव्य स्पर्धेसाठी कविता पाठवा

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित ३२व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेसाठी गुरुवार, दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत कविता पाठवाव्यात, असे आवाहन नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी केले आहे.

सदर स्पर्धा प्रत्यक्ष सादरीकरण करून घेण्यात येईल. स्पर्धेसाठी इच्छुक कवीने आपली एक कविता अनिकेत गुहे (सहकोषाध्यक्ष) यांच्या व्हॉट्सॲप क्रमांक
९८२२८८४९९२
वर टाईप करून पाठवायची आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खालील नियमावलीचे पालन करावे.
१) कवितेला विषयाचे बंधन नाही.
२) कविता किमान १२ ते कमाल २० ओळीपर्यंत असावी. यापेक्षा दीर्घ असू नये.
३) सुरुवातीला ‘नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित श्रावणी काव्य स्पर्धा ३२ साठी’ असा उल्लेख करावा. कवितेचे शीर्षक, कविता, त्याखाली संपूर्ण नाव, आपला परिसर आणि संपर्क क्रमांक टाईप करावा.
४) कवितेमधून राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुठल्याही जाती – धर्मावर टीका करणारी कविता नसावी.
५) स्पर्धेला प्रवेशशुल्क नाही.
६)कविता स्पर्धेच्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी येऊन स्वतः सादर करायची आहे. सादरीकरणाचे सुद्धा गुण गृहीत धरले जातील.
७) पारितोषिक प्राप्त कवींना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात येईल.
८) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
९) व्हॉट्सॲपवर
टाईप करून पाठवलेली कविताच स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. (कवितेचा कागदावर लिहून काढलेला फोटो किंवा इतर कुठल्याही स्वरूपात चालणार नाही.)
१०) वरील नियमात न बसणाऱ्या कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
११) ज्यांनी दिलेल्या मुदतीत कविता पाठवलेल्या आहेत त्यांनाच स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल.
१२) श्रावणी काव्यस्पर्धा दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता पिंपरी – चिंचवड परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ आठ दिवस अगोदर कळवण्यात येईल. अधिक माहितीसाठी
प्रा. तुकाराम पाटील (कार्याध्यक्ष)
९०७५६३४८२४ किंवा माधुरी ओक (सचिव)
९७६३३२४१८७ यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button