ताज्या घडामोडीपुणे
नवरोजी वाडिया कॉलेज यांचा ९३ वा स्थापना दिवस उत्साहात संपन्न

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- आज नवरोजी वाडिया कॉलेज, पुणे यांचा ९३ वा स्थापना दिवस टाटा असेंब्ली हॉलमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. मिलिंद कांबळे (चेअरमन, डिकी) यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी संस्थेचे ट्रस्टी डॉ. अशोक चांडक, प्रा. सचिन सानप, कॉलेजचे प्राचार्य प्रा. वसंत चाबुकस्वार, उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.













