दिवाळीनिमित्त नारीशक्तीचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात नारी शक्तीचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, साड्या आणि फराळवाटप संपन्न
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साठे पिंपळे गावचे शिल्पकार प्रथम नगरसेवक, माजी महापौर
कै. प्रभाकर नारायणराव साठे मेमोरियल फाउंडेशन पिंपळे निलख च्या वतीने दिवाळीनिमित्त “भाऊबीज २०२५” या महिला स्नेह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पिंपळे निलख मनपा शाळेसमोरील मैदानात आयोजित केलेल्या या उपक्रमास हजारो नागरिक विशेषतः महिला भगिनी उपस्थित राहिल्या.
या दिवाळी स्नेह उपक्रमांतर्गत, नारी शक्तीचा सन्मान, मनोरंजन पर आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि साड्या आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
परिसरात विविध क्षेत्रात ५ उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना फाउंडेशनचा नारीशक्ती पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये आदर्श माता पुरस्कार देऊन श्रीमती हिराबाई धरपळे, राजकीय क्षेत्रातील श्रीमती आरती चोंधे, सामाजिक क्षेत्रातील श्रीमती शोभा जगताप, धार्मिक क्षेत्रातील सौ. कुसुम इंगवले यांचा आणि उद्योजकता सौ. रुपाली पवार यांना स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
मायबोली महाराष्ट्राची या सांस्कृतिक आणि मनोरंजन पर कार्यक्रमाचे आयोजन नागरिकांसाठी करण्यात आले, यालाही नागरिकांची मोठी पसंती लाभली.
दिवाळीनिमित्त सर्वच महिला भगिनींना साड्या आणि फराळाचे वाटप फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले याचा सुमारे 1200 महिलांनी आनंद स्वरुपात लाभ घेतला.
याप्रसंगी बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज साठे म्हणाले, “हा कार्यक्रम निवडणूक आली म्हणून घेतला गेलेला नाही तर अनेक वर्षापासून या परिसरात फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार, बाल जत्रा, खेळ पैठणीचा, विद्यार्थी दत्तक योजना असे उपक्रम घेण्यात आलेले आहेत मात्र कोरोना नंतरच्या काळामध्ये काही व्यत्यय निर्माण झाला होता, फाउंडेशनने केलेल्या विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत दहावीचा शैक्षणिक खर्च केलेले अनेक विद्यार्थी आज यशस्वी नागरिक झाले आहेत याबद्दल आनंद वाटतो, त्या विद्यार्थ्यांच्या काही माता इथे आज उपस्थित आहेत, याचा अभिमान वाटतो. ज्या समाजात राहतो, वाढतो, जगतो त्या समाजाचे आपण देणे लागतो म्हणून हा उपक्रम आयोजित केला आहे या पुढील काळात सुद्धा सातत्याने हा उपक्रम फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येईल, राजकारण हे निवडणुकीपूर्ती असावे निकाल नंतर पुन्हा मनोमिलन होणे गरजेचे म्हणून हि हा उपक्रम आयोजिला आहे”.”या फाउंडेशन ला भविष्यात नागरिकांची अशीच उत्तम साथ आवश्यक आहे” असे आवाहन साठे यांनी कार्यक्रमादरम्यान केले.
या कार्यक्रमासाठी विशेषतः शहराचे नेते राहुल कलाटे, नगरसेवक विनायक गायकवाड, नगरसेविका आरती ताई चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बाबू नायर, नितीन इंगवले, शिरीष आप्पा साठे, स्नेहा ताई कलाटे, प्रकाश बालवडकर, आदी मान्यवर तसेच पिंपळे निलख परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे, भजनी मंडळाचे, महिला बचत गटांचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.













