ताज्या घडामोडीपिंपरी

नाना काटे व शितल काटे यांच्या पाठपुराव्यामुळे मिलिटरी हद्दीतील १८ मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात”

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरातील मिलिटरी हद्दीतील महत्त्वाच्या १८ मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांच्या सूचनेनुसार आणि मा. विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे तसेच नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे.

काही दिवसांपूर्वी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत नाना काटे यांनी प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरातील या १८ मीटर रुंदीच्या मिलिटरी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. सदर रस्त्याचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असतानाही काही ठिकाणी डांबरीकरण अपूर्ण राहिल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या रस्त्याचा वापर कुणाल आयकॉन, एस-३ लाईफस्टाईल, शुभश्री वुड्स, रोझवुड, रिदम, प्राईम प्लस, रोझ व्हॅली, पीस व्हॅली, समृद्धी पार्क, रोझ काउंटी, अल्कोव, साई पर्ल यांसह परिसरातील अनेक मोठ्या सोसायट्यांतील हजारो नागरिक रोज करत आहेत. मात्र रस्ता अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडी, धूळ, चिखल, अपघातांचा धोका आणि वाहनांचे नुकसान अशा समस्या सातत्याने उद्भवत होत्या.

ही गंभीर बाब नाना काटे यांनी थेट  अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अजितदादांनी जागेवरच महापालिका आयुक्त  श्रवण हार्डीकर यांना तातडीने रस्त्यावरील अडचणी दूर करून काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने हालचाली करत आज या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.

या कामाच्या प्रारंभामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अजितदादा पवार, नाना काटे व शितलताई काटे यांनी दाखविलेल्या तत्परतेचे व लोकहितकारी भूमिकेचे सोसायटीतील नागरिकांनी स्वागत केले आहे. दीर्घकाळ रखडलेला प्रश्न सुटल्याने आता या मार्गावरून प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button