पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई त्वरित करण्यात यावी – नाना काटे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, (drenej line) नाले सफाई त्वरित करण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे (nana kate) यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई केली जाते परंतु यावर्षी तसे केल्याचे दिसत नाही कारण सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, व या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहरातील सर्व स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले यातील कचरा साफ न केल्याने स्ट्रॉम वॉटर, (strom water) ड्रेनेज लाइन तुडुंब भरून जागो जागी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असून नगरिकाना वाहने चालवताना, रस्त्याने चालताना अडचणीना सामोरे जावे लागत आहे तसेच या साचलेल्या पाण्याने घणीचे साम्राज्य पसरत असून नगरिकाना आरोग्याच्या सम्मसेला देखील सामोरे जावे लागत आहे. मा. आयुक्त महोदय ही खूप गंभीर बाब असून, आवकाळी पावसाने जर शहराचे हे हाल होत असतील तर नुकताच येवून ठेपलेल्या मोठ्या पावसात शहराची अवस्था जलमय होईल व संपूर्ण शहराला मोठया संकटाला सामोरे जावे लागेल.
पावसाळ्यापूर्वी शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई करण्याचे त्वरित आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे, असे ही निवेदनात म्हटले आहे.













