महात्मा फुले महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ रॅली जल्लोषात

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागविणे आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचा संदेश देण्यासाठी आज (१२ ऑगस्ट) महात्मा फुले महाविद्यालय,पिंपरी येथे राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांच्या संयुक्त
विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ रॅली उत्साहात पार पडली.
रॅलीचे नेतृत्व प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, गणेश भांगरे ( एनएसएस कार्यक्रम अधिकारी), लेफ्ट. प्रसाद बाठे ( एनसीसी ए.एन.ओ.), महाविद्यालयाचे तिन्ही विद्याशाखा उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. डॉ. संगीता आहिवळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे व
कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक सौ. रुपाली जाधव यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनसीसी व एनएसएस विभागातील अधिकारी,महाविद्यालयीन शिक्षकवर्ग, प्रशासकीय कर्मचारी आणि महाविद्यालयातील वरिष्ठव कनिष्ठ
विभागातील विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून देशभक्ती, ऐक्य आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्याचा संदेश या रॅलीतून
नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.













