भाषा ही केवळ बोलण्याचे किंवा लिहिण्याचे साधन नाही तर ती आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा आणि ओळखीचा आत्मा आहे – इम्रान शेख
महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे हिंदी दिवस उत्साहपूर्वक संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे हिंदी दिवस संपन्न झाला .या प्रसंगी हिंदी भाषेचे महत्त्व,गौरव आणि साहित्यिक परंपरा यावर प्रकाश टाकत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली. त्यानंतरमहाविद्यालयाच्या उपप्राचार्य व हिंदी विभागप्रमुख प्रो. (डॉ.) कामायनी सुर्वे यांनी प्रास्ताविक केले .
समारंभाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध साहित्यिक व अनुवादक,स.प.महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) गोरख थोरात होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ‘हिंदीतील रोजगाराच्या संधी’या विषयावर विचार मांडले. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून व्यक्तीच्या अभिव्यक्तीचे साधन आहे, असे सांगून त्यांनी हिंदीमध्ये उपलब्ध असलेल्या सरकारी व बिगर-सरकारी रोजगाराच्या संधींवर सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले – “करण्यानेच होते, आधी करायला हवे”. म्हणूनच आपला कल ओळखून रोजगाराच्या क्षेत्रात उतरावे, असा संदेश त्यांनी दिला.
यानंतर युवक शहर अध्यक्ष व हिंदी विभागाचे माजी विद्यार्थी इम्रान शेख यांनी भाषण केले. त्यांनी “भाषा ही केवळ बोलण्याचे किंवा लिहिण्याचे साधन नाही तर ती आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरांचा आणि आपल्या ओळखीचा आत्मा आहे” हे अधोरेखित केले व समाजात हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले.सध्याच्या Gen-z पिढीच्या आवडीनिवडी,तसेच सोशल मीडियाच्या युगात रील्स,सिनेमा आणि युट्यूबच्या माध्यमातून हिंदीचा प्रसार कसा होत आहे,यावर त्यांनी प्रकाश टाकला.
यानंतर महाविद्यालयाच्या माजी हिंदी विभाग प्रमुख प्रा. अलका चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून “कामाविषयी निष्ठा आणि जिद्दीमुळेच यश मिळते” असे सांगून संघर्षाबद्दल सजग केले आणि महाविद्यालयातील सुवर्णक्षणांची आठवण करून दिली.
यानंतर डॉ.प्रमोद परदेशी , डॉ. वैशाली खेड़कर व डॉ.अलका घोडके यांनी संपादित केलेले पुस्तक ‘आधुनिक हिंदी साहित्य में पर्यावरण चेतना’ प्रकाशित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रो . (डॉ.) पांडुरंग भोसले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी विविध यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणे देत प्रेरणा दिली.
हिंदी दिवसाच्या निमित्ताने हिंदी विभागाने महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला :
हिंदी काव्यवाचन स्पर्धा : मुस्कान इब्राहिम गोलंदाज – प्रथम, सुमय्या महेमूद सय्यद – द्वितीय, श्रुति साईनाथ वाकडे – तृतीय.
हिंदी वक्तृत्व स्पर्धा : मुस्कान इब्राहिम गोलंदाज – प्रथम, पल्लवी राम लाड – द्वितीय, साक्षी कालूराम मस्के – तृतीय, तर आशिक रविंद्र शिरसाट आणि संजोग सुरेश मस्के – उत्तेजनार्थ.
हिंदी निबंध स्पर्धा : श्रावणी पांडुरंग फुलझळके – प्रथम, अंकित लक्ष्मण मुजमुले – द्वितीय, सुमैया महमूद सय्यद – तृतीय, तर शिवानी संगम तिवारी – उत्तेजनार्थ.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागाची विद्यार्थिनी सुमय्या सय्यद हिने केले, तर आभार प्रदर्शन स. प्रा. मंगेश वाडेकर यांनी केले. संपूर्ण समारंभ सौहार्द, उत्साह आणि हिंदी भाषेबद्दलच्या आस्थेच्या वातावरणात संपन्न झाला.













