ताज्या घडामोडीपिंपरी

वडगाव मावळ तहसीलदार कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा; आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण

Spread the love

 

वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याच्या ६६व्या वर्धापन दिनानिमित्त वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून ध्वजारोहणाचा सन्मान मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांना लाभला.

राज्य दिनाचा हा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला, समृद्ध सांस्कृतिक वारशाला, आणि मेहनती जनतेच्या कणखरपणाला अभिवादन करण्याचा पवित्र क्षण होता. या राज्याने आपल्याला ओळख, संधी आणि अभिमान दिला असून, त्याच्या उज्वल भविष्यासाठी एकजुटीने कार्य करण्याची प्रेरणा अशा प्रसंगी मिळते, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

कार्यक्रमास वडगाव मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, समाजसेवक अविनाश बोगदे, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, नायब तहसीलदार गणेश तळेकर, आदित्य पिसाळ, अमोल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे, तसेच तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व ‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा’ या गीताने संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेमाने भारून गेले.

या कार्यक्रमातून उपस्थितांना महाराष्ट्राच्या सामूहिक सामर्थ्याची आणि सामाजिक एकतेची प्रचीती आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button