Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आमदार सुनील शेळके यांचा लोणावळा दौरा; विविध विकास प्रकल्पांचा घेतला आढावा
ताज्या घडामोडी

आमदार सुनील शेळके यांचा लोणावळा दौरा; विविध विकास प्रकल्पांचा घेतला आढावा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com31 May 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोणावळा शहरातील विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत आमदार सुनील शेळके यांनी आज लोणावळ्यात आढावा बैठक घेतली. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सुरक्षाविषयक गरजांशी संबंधित असलेल्या या प्रकल्पांची गती वाढवून नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.

दौऱ्यात त्यांनी खालील प्रमुख ठिकाणांना भेट देऊन कामाची सद्यस्थिती जाणून घेतली:

🔹 *ग्रामीण पोलीस स्टेशन, तुंगार्ली* – नवीन इमारतीचे काम लवकर पूर्ण होऊन ग्रामीण भागातील सुरक्षेसाठी सक्षम व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

🔹 *पांगळोली शासकीय इमारत* – गावपातळीवर शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी या इमारतीचे महत्त्व अधोरेखित करत कामाला वेग देण्याचे निर्देश दिले.

🔹 *खंडाळा गावातील शाळेची जागा* – गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रस्तावित शाळेच्या जागेची पाहणी करण्यात आली.

🔹 *लोणावळा शहर पोलीस स्टेशनची नवीन इमारत* – शहराच्या वाढत्या गरजांनुसार तांत्रिकदृष्ट्या सक्षम पोलिस यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

🔹 *छत्रपती शिवाजी महाराज स्मारक* – या प्रेरणादायी स्मारकाच्या कामाला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व असल्याचे सांगत लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आवाहन.

🔹 *कन्याशाळा, भांगरवाडी* – जीर्ण झालेल्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी तातडीची कार्यवाही गरजेची असल्याचे मत व्यक्त केले.

🔹 *उपजिल्हा रुग्णालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक* – आरोग्य व सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या या प्रकल्पांच्या कामांची प्रगती तपासण्यात आली.

या दौऱ्यानंतर लोणावळा नगरपरिषद कार्यालयात सर्व संबंधित अधिकारी, अभियंते आणि प्रशासकीय प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक प्रकल्पावरील कामाची सद्यस्थिती, येणाऱ्या अडचणी, निधीची स्थिती आणि पूर्णत्वासाठी लागणारा कालावधी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

“लोणावळा शहराचा सर्वांगीण विकास हा आपला संकल्प आहे. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,” असे मार्गदर्शन आमदार सुनील शेळके यांनी या वेळी केले.

लोणावळा शहरांमधील मागील अनेक वर्षापासून नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला नांगरगाव भांगरवाडी या उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पुणे हे स्वतः या कामाची पाहणी व लोणावळा शहरातील इतर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी 5 जुलै रोजी लोणावळा शहरामध्ये येणार आहेत. लोणावळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे तसेच लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारती देखील 80 ते 90% काम पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण ही कामे 70 टक्के पूर्ण झाली आहेत. पुढील कामांना गती देण्यासाठी वाढीव निधी देण्याचे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. लोणावळा शहरातील भाजी मंडई विकसित करत असताना येथील अस्तित्वात असलेले व्यवसायिक यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन त्या पद्धतीने आराखडा तयार केला जाईल असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी नागरिकांना दिले. येथील कामगारांचा वारसा हक्क व अनुकंप हा प्रश्न देखील पुढील काही दिवसांमध्ये सोडवला जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

नागरिकांनी या आढावा बैठकीमध्ये अनेक समस्या आमदार सुनील शेळके यांच्यासमोर मांडल्या. नगरपरिषदेमध्ये वारंवार चकरा मारून देखील समस्या सुटत नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. पाच जुलै रोजी जिल्हाधिकारी लोणावळा शहरामध्ये येणार आहेत ते येण्यापूर्वी नागरिकांच्या या समस्यां न सुटल्यास जिल्हाधिकारी यांच्यासमोर या समस्यांचा पाढा वाचून दाखवला जाईल असे देखील आमदार सुनील शेळके यांनी ठणकावून सांगितले आहे.

नागरिकांना वेळ द्या आठवड्यातील एक दिवस निश्चित करा – शेळके

लोणावळा मुख्याधिकारी नागरिकांना भेटत नाहीत नागरिकांची योग्य प्रकारे संवाद साधत नाहीत अशा अनेक तक्रारींची सरबती या आढावा बैठकीमध्ये नागरिकांनी केली. त्यावर लोणावळा मुख्याधिकारी यांनी नागरिकांना वेळ देण्यासाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित करावा त्या दिवशी कार्यालयामध्ये उपस्थित राहत नागरिकांचे प्रश्न सोडवावेत त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात अशा सूचना आमदार सुनील शेळके यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांना दिल्या आहेत. तसेच अधिकारी वर्गाने नागरिकांना उलट उत्तरे देण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे व नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशा शब्दात अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगणेशोत्सवात ‘दगडूशेठ’ गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान
Next Article ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाद्वारे सफाई सेवकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.