ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

हाफकिन बायो-फार्मा कामगारांच्या प्रश्नांवर व्यवस्थापनाने तात्काळ उपायोजना करावे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सूचना

Spread the love

 

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  हाफकिन बायो-फार्मा पिंपरी चिंचवड येथील कामगारांच्या प्रश्नांवर व्यवस्थापनाने तात्काळ उपायोजना करावे असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडमधील कामगारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक पार पडली.या बैठकीस हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महेंद्रकर, कामगार प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले, पगाराव्यतिरिक्त थकीत देयके, निवासस्थान नुतनीकरण, निवासस्थानी दुर्घटना घडल्यास जबाबदारी, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, पदोन्नती अशा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

पिंपरी-चिंचवडमधील कामगारांचे थकीत देणे किती आहे याची माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी, निवासस्थान नुतनीकरण टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर करावी, तसेच व्यवस्थापनाने सर्व माहिती , रक्कमांसह पूढील आठवड्यात घेवून उपस्थित रहावे.

यावेळी उपाध्यक्ष बनसोडे यांनी म्हणाले हाफकिनने तयार केलेले इंजेक्शन पुणे महानगरपालिकेला विक्रीसाठी प्रस्ताव करावा, त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून कामगारांचे थकीत देणे भागवता येईल. यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.सदर बैठकीत महामंडळातील कामगारांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दिपक पेडणेकर, सरचिटणीस, नितिन तिटिकर उपाध्यक्ष – मंगेश कदम खजिनदार, दिलीप मादगे उपाध्यक्ष,डॉ. कैल्लासभाऊ कदम (अध्यक्ष इंटक) महाराष्ट्र राज्य, उत्तम लक्षण गायकवाड, अध्यक्ष,सुजित दिनकर गांगुर्ड (सेक्रेटरी),रमाकांत हळदीकर, (खजिनदार ), शांताराम कदम (उपाध्यक्ष), दिनेश जगताप सदस्य आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button