पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच उद्या महारुद्राभिषेक सोहळा

आयोजक : विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रावणातील शेवटच्या सोमवारी शहरात प्रथमच भव्य महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन होत आहे. विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने श्री नागेश्वर शिव मंदिर, एस. के. एफ. कॉलनी चिंचवड येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
काशी येथील विद्वान पंडितांच्या पाऊपौरोहित्याखाली हिमालयातील 1001 औषधी वनस्पतींचा वापर करून हा दुर्मिळ व पवित्र महारुद्राभिषेक उद्या १७ ऑगस्टला दुपारी 12 ते ६ या वेळेत पार पडेल. यानंतर सायंकाळी ६ वाजता महाआरती व 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
“या दिव्य धार्मिक सोहळ्याचा लाभ पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने घ्यावा,” असे आवाहन नामदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे.
या धार्मिक सोहळ्यामुळे श्रावणाचा उत्सव भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.













