चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

आमदार अमित गोरखे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यासह चिंचवड येथे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  युवा आमदार अमित गोरखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये साहित्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ४ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भव्य पुस्तक प्रदर्शन भरवले जाणार आहे. हे प्रदर्शन नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे होणार असून, साहित्यप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

यासोबतच, आमदार अमित गोरखे यांचा अभीष्टचिंतन सोहळा ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता राजर्षी शाहू क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, हा सोहळा नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

तीन दिवसीय चालणारे हे प्रदर्शन दररोज सकाळी १०:०० ते सायंकाळी ८:३० वाजेपर्यंत सुरू राहील, ज्यामुळे नोकरी करणारे आणि विद्यार्थी या दोघांनाही त्यांच्या सोयीनुसार प्रदर्शनाचा लाभ घेणे शक्य होईल. या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांचा वैविध्यपूर्ण संग्रह.

यामध्ये सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध असणार आहेत, जसे की कवितासंग्रह आणि कादंबरी यांसारख्या लोकप्रिय साहित्यासह विविध विषयांवरील पुस्तके एकाच छताखाली वाचकांसाठी उपलब्ध असतील. पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक जडणघडणीसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.

या पुस्तक प्रदर्शनामध्ये लाखो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध असून, आयोजकांनी शहरवासीय आणि वाचनप्रेमी नागरिकांना आवाहन केले आहे की  या तीन दिवस चालणाऱ्या भव्य पुस्तक प्रदर्शनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन शहराची वाचनसंस्कृती जपणारी आणि समृद्ध करणारी नवी ओळख निर्माण करावी.

साहित्य आणि ज्ञानाच्या या उत्सवात सहभागी होऊन वाचनाचा आनंद अनुभवावा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button