शेकडो भगिनींनी आमदार अमित गोरखे यांना बांधली विश्वासाची राखी

आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मानले आभार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षाबंधनाचा पवित्र सण पिंपरी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा झाला. पिंपरी विधानसभा क्षेत्रातील शाहू नगर,संभाजीनगर, दत्त नगर विद्यानगर,मोरवाडी परिसरातील महिलांनी आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना राख्या बांधल्या. या खास कार्यक्रमात ५०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी केवळ आमदार गोरखे यांनाच नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बंद लिफाफ्यातून १००० हून अधिक राख्या पाठवून एक अनोखा उपक्रम राबवला. या राख्यांमध्ये महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांबद्दल आभार व्यक्त केले.
महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि म्हटले की, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी महिलांप्रती जी तत्परता दाखवली आहे, ती खूप मोलाची आहे. ‘लाडकी बहीण’ यांसारख्या योजनांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. याशिवाय, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींमध्येही त्यांना समान संधी मिळत आहेत. महिलांच्या या उपक्रमाने पिंपरी मतदारसंघात एक सकारात्मक आणि सामाजिक संदेश दिला.
या कार्यक्रमात महिलांनी आमदार अमित गोरखे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमदार गोरखे यांनी नेहमीच आमच्या मतदारसंघातील महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांना राखी बांधताना आम्हाला खऱ्या भावाची जाणीव होत आहे.” महिलांनी आमदार गोरखे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध महिला सक्षमीकरण कार्यक्रमांची प्रशंसा केली.
याप्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “आपल्या संस्कृतीतील सण हे केवळ एक परंपरा नसून, ते नातेसंबंधांना अधिक दृढ करण्याचे माध्यम आहेत. आज माझ्या सर्व बहिणींनी दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता ही माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाची राहिली आहे आणि ते माझे कर्तव्य देखील आहे.” त्यांनी पुढे आश्वासन दिले की, “मी तुमच्यासाठी नेहमीच ‘आपला भाऊ’ म्हणून उपलब्ध राहीन आणि तुमच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होईन. तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.”
कार्यक्रमाला नगरसेविका अनुराधा गोरखे तसेच भाजपा पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष सुप्रिया चांदगुडे, मनीषा शिंदे, दीपाली करंजकर,कुसुम वाघमारे,जयश्री पाटील , व मोठ्या प्रमाणात महिला बचतगट महिला उपस्थित होत्या.








