ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे निगडीत आज करिअर गाईडन्स सेमिनार

निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात “बारावी नंतर पुढे काय?” या विषयावर मार्गदर्शन

Spread the love

एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे करिअर गाईडन्स सेमिनार
निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात “बारावी नंतर पुढे काय?” या विषयावर मार्गदर्शन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  बारावीची परीक्षा संपल्यानंतर “पुढे काय करावे?” हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर नेहमीच उभा राहतो. विद्यार्थ्यांनी आपल्या आवड, क्षमता आणि संधी लक्षात घेऊन योग्य करिअर निवडणे ही जबाबदारीची वेळ असते. या निवड प्रक्रियेत पालकांचे मार्गदर्शन आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरतो.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी आणि पालकांना निर्णय घेण्यास मदत व्हावी यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे आणि ॲडमिशन सजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “बारावी नंतर पुढे काय?” या विषयावर मोफत करिअर गाईडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.
हा सेमिनार दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी, पिंपरी-चिंचवड येथे पार पडणार आहे.

या सेमिनारमध्ये एचएससीनंतर उपलब्ध विविध शैक्षणिक पर्याय, अभियांत्रिकी शाखेतील प्रवेश प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, शिष्यवृत्ती योजना, तसेच परीक्षेच्या तयारीसाठी प्रभावी रणनीती यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय देशातील प्रमुख महाविद्यालये आणि संस्था यांची माहितीही दिली जाईल.मार्गदर्शनासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे येथील विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. उल्हास माळवडे आणि ॲडमिशन सजेशनचे संचालक अक्षयकुमार भंडारी उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने पिंपरी-चिंचवड परिसरातील तज्ञ शिक्षकांना ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

चौकट:
कार्यक्रम: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सेमिनार
ठिकाण: ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी, पिंपरी-चिंचवड
दिनांक: ११ नोव्हेंबर २०२५वेळ: दुपारी ४:०० वाजता
प्रायोजक:एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे
सह-प्रायोजक: ॲडमिशन सजेशन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button