ताज्या घडामोडीपिंपरी

“हातात झाडू, मनात सेवा — औंध जिल्हा रुग्णालयात मेघराज लोखंडे यांचा प्रेरणादायी उपक्रम”

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्य दिनानिमित्त औंध जिल्हा रुग्णालय परिसरात शिवसेना युवासेना तर्फे विशेष स्वच्छता व सुशोभिकरण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाचे नेतृत्व मेघराज लोखंडे उपजिल्हाप्रमुख युवासेना (मावळ लोकसभा) यांनी केले.

मोहीमेत रुग्णालयाचा मुख्य प्रवेशद्वार, वॉर्ड परिसर, बाग, पथमार्ग, पार्किंग क्षेत्र यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच परिसरातील झाडांची छाटणी, कचरा व्यवस्थापन आणि फुलझाडांची लागवड करून वातावरण अधिक आकर्षक बनविण्यात आले.

या उपक्रमात युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतच मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी आणि हॉस्पिटल कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गौरव जगताप, जॉय चोपडे, हर्षद शिंदे, आर्यन मसुरे, अमन शेख, तन्मय सुतार, शंतनू नांगरे, धम्मदीप गायकवाड, संग्रामसिंग लोधा आणि चैतन्य जाधव यांनी विशेष परिश्रम घेत मोहिम यशस्वी केली.

या वेळी मेघराज लोखंडे यांनी सांगितले की, “स्वच्छता ही केवळ उपक्रमापुरती मर्यादित न राहता ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. समाजहितासाठी अशा सकारात्मक उपक्रमांची गरज असून युवासेना नेहमीच यात आघाडीवर राहील.” त्यांनी मोहिमेत सहभागी सर्व कार्यकर्ते, मनपा अधिकारी आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

नागरिकांनी कचरा उघड्यावर टाकल्यास अनेक समस्या येतात. दुर्गंधी पसरते, डास, माश्यांची पैदास होते, आणि रोगराई पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे, कचरा योग्य ठिकाणी म्हणजे कचरा कुंडीत किंवा कचरा गाडीत टाकला पाहिजे. शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी हे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या घरातील कचरा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून कचरा गाडीत टाकू शकता. यामुळे कचरा व्यवस्थापनात मदत होईल आणि पर्यावरणाची देखील काळजी घेतली जाईल.

स्नेहल सोनवणे
आरोग्य निरीक्षक प्रभाग क्र ३१
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button