“रक्तासाठी झगडणाऱ्या रुग्णाला जीवदान; युवासेनेच्या मेघराज लोखंडेंचा धडाडीचा हस्तक्षेप!”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला रक्ताची तातडीने गरज होती. डॉक्टरांनी तब्बल ८ तास वाट पाहूनही रक्ताची पूर्तता केली नव्हती. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची चिंता वाढली आणि त्यांनी युवासेना जिल्हा उपाध्यक्ष मेघराज लोखंडे यांच्याशी संपर्क साधला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लोखंडे यांनी वेळ न दवडता एस.आय. हॉस्पिटल (जिल्हा रुग्णालय) गाठले व संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून रुग्णासाठी रक्ताची व्यवस्था करून दिली. त्याच्या या तत्परतेमुळे रुग्णाला आवश्यक असलेले रक्त वेळेवर मिळाले आणि त्याचे प्राण वाचले.
या दरम्यान, श्री. लोखंडे यांनी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली व अशा प्रकारची दुर्लक्षपणा पुढे चालणार नाही, असा स्पष्ट इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिला. त्यांच्या या कृतीचे परिसरात आणि रुग्णाच्या नातेवाईकांतून कौतुक होत आहे.














