महिला डॉक्टरांचा सन्मान आणि सशक्ततेचा उत्सव : “मेडी आयकॉन – भारत इंटरनॅशनल २०२५” पुरस्कार सोहळा पुण्यात संपन्न

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या विविध राज्यांत आरोग्यसेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला डॉक्टरांचा गौरव करणारा “मेडी आयकॉन – भारत इंटरनॅशनल २०२५” पुरस्कार सोहळा वाकड, पुणे येथे अत्यंत भव्यतेने पार पडला.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. विजया राहतकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिला डॉक्टरांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आणि त्यांना समाजातील परिवर्तनाचे शिल्पकार ठरवले.
या कार्यक्रमाचे आयोजन “मेडीक्वीन भारत इंटरनॅशनल” या संस्थेने केले होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांनी शुभेच्छा संदेश पाठवून सर्व पुरस्कार्थी डॉक्टरांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात विविध राज्यांतील नामवंत डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि हरियाणा येथील डॉक्टरांचा समावेश होता. काही प्रमुख पुरस्कार विजेते:
– डॉ. सुनीता मोरे – व्हिजनरी हेल्थकेअर लीडर (पुणे)
– डॉ. स्वाती सावंत चव्हाळे – बेस्ट ENT डॉक्टर (ठाणे)
– डॉ. चारुलता शाह – डॉक्टर्स गार्डियन अवॉर्ड (भिवंडी)
– डॉ. ऋचा पवार – नारी शक्ती सन्मान (रोहतक)
– डॉ. मीनाक्षी सुंदरम – बेस्ट ल्याप्रोस्कोपिक व रोबोटिक गायनॅक सर्जन (चेन्नई)
– डॉ. प्रेरणा बेरी – आयुर्वेद वेलनेस लीडरशिप (पुणे)
– डॉ. प्राजक्ता शाह – बेस्ट आयुर्वेद अँड पंचकर्मा क्लिनिक (पुणे)
– डॉ. नेहा जाधव – बेस्ट इन हाय रिस्क ऑब्स्टेट्रिक्स, IVF कन्सल्टंट : (पुणे)
– डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर – लेगसी ऑफ केअर अवॉर्ड (भिवंडी)
– डॉ. यामिनी भालेराव सोनवणे – बेस्ट होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर (पुणे)
– डॉ. अमृता बविस्कर – आरोग्य रत्न अवॉर्ड : (ठाणे)
– डॉ. धनश्री काळे – बेस्ट इन अॅस्थेटिक क्लिनिक – हेअर, नेल्स, स्किन, लेझर्स (पुणे)
– डॉ. भूषण सुभाष पाटील – बेस्ट सायकायट्रिस्ट (कल्याण)
– डॉ. अनुशा राज – बेस्ट पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट (मैसूर)
– डॉ. भाग्यलक्ष्मी – बेस्ट क्लिनिक अवॉर्ड (मैसूर)
– डॉ. सारिका वार्ठे – बेस्ट हेल्थकेअर एक्सलन्स : ठाणे
– डॉ मधुरा सुर्वे – आयुर्वेद वेलनेस अल्टरनेटिव मेडिसिन एंड हेल्थकेअर (नवी मुंबई)
या पुरस्कार सोहळ्यात *“मेडीक्वीन भारत इंटरनॅशनल मिस मिसेस २०२५”* सौंदर्य स्पर्धाही पार पडली. यामध्ये आरोग्यसेवेत कार्यरत महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी सेलिब्रिटी पाहुणे म्हणून अभिनेता **राकेश बापट** यांनी उपस्थिती लावली.
विजेत्या स्पर्धकांमध्ये पुढील डॉक्टरांचा समावेश होता:
🔹 रॉयल कॅटेगिरी:
* विनर: डॉ. अनुषा हेगडे (कर्नाटक)
* फर्स्ट रनर अप: डॉ. प्रणीता पांडे (महाराष्ट्र)
* सेकंड रनर अप: डॉ. रुची मिरजकर, डॉ. दीपाली राणे (महाराष्ट्र)
🔹 मिस कॅटेगिरी:
* विनर: डॉ. अनुषा राज के (कर्नाटक)
* फर्स्ट रनर अप: डॉ. दिशा जोशी (कर्नाटक)
* सेकंड रनर अप: डॉ. श्रिनिधी (कर्नाटक)
🔹 क्लासिक कॅटेगिरी:
* विनर: डॉ. मीनाक्षी सुंदरम (तामिळनाडू)
* फर्स्ट रनर अप: डॉ. रेखा थोते (महाराष्ट्र)
* सेकंड रनर अप: डॉ. प्रीती हिरेमठ (कर्नाटक)
“मेडीक्वीन क्लब ग्लोबल” ही संस्था महिलांच्या आरोग्य व कॅन्सर जनजागृतीसाठी कार्य करते. गेली सहा वर्षे या संस्थेने समाजसेवेतील डॉक्टरांचा गौरव करत महिलांच्या सशक्तीकरणाला चालना दिली आहे.
“सशक्त महिला म्हणजे सशक्त समाज” हे ब्रीद अंगीकारून, मेडीक्वीनचा हा उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत आहे.












