अलिबाग ते नारायणपूर पायी दिंडी सोहळ्यातील भाविकांना मराठवाडा जनविकास संघातर्फे ब्लॅंकेट , फळे वाटप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अलिबाग ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी सोहळ्यात आलेल्या भाविकांचे मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने अरुण एस. पवार आणि बालाजी एस. पवार यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लॅंकेट , फळे वाटप करण्यात आले.
यावेळी जीएसटी आयुक्त डी.बी. घोडे, पुनाजी रोकडे, पी. एन. कांबळे, कृष्णा भालचिम, ह.भ.प. लक्ष्मण पवार, महादेव सुतार, ह भ प सूर्यकांत कुरुलकर स्वामी , वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, बळीराम माळी, दिनेश पवार, भीमाशंकर भोसले, किशोर अट्टरगेकर, सखाराम वालकोळी, गोविंद तांबवडे, सुग्रीव पाटील, रंगनाथ आवारे, लक्ष्मण जाधव, संतोष लातूरे, गोपाळ कांबळे, चंद्रकांत रासकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गोपाळ कांबळे म्हणाले, की मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून अरुण पवार करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी लावलेले हजारो वृक्ष डौलाने उभे आहेत. समाजातील उपेक्षित घटकांना नेहमीच मदत करत आलेले आहेत.
चंद्रकांत रासकर म्हणाले, की अरुण पवार हे अहोरात्र सेवाकार्य करत आहेत. त्यांच्या आई-वडिलांची खूप मोठी पुण्याई आहे. म्हणूनच ते निस्वार्थीपणे गरजू विद्यार्थी, अंध -अपंग विद्यार्थी, वारकरी सेवा, मुक्या प्राण्यांची सेवा, तसेच वृक्ष लागवडीचे सेवाकार्य निस्वार्थीपणे करत आहेत.
अरुण पवार म्हणाले, की अलिबाग ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी सोहळ्यात आलेल्या भाविकांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने भाविकांची सेवा करण्यात आली. दत्त जयंती उत्सवासाठी श्री दत्त महाराजांच्या पादुका घेऊन पायी प्रवास करणे, ही एक भक्तीपूर्ण परंपरा आहे. दिंडीमधील वारकरी अनेक दिवसांचा पायी प्रवास करत असल्याने त्यांची सेवा करणे हे मोठे धार्मिक व सामाजिक कार्य आहे.
प्रास्ताविक मराठवाडा जनविकास संघाचे सचिव सूर्यकांत कुरुलकर यांनी, तर आभार दत्तात्रय धोंडगे यांनी मानले.




















