जिंकलो रे राजे हो आपण तुमच्या ताकदीवर; प्रचंड विजय होताच मनोज जरांगे यांचे पहिले उद्गार

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन सुरू होतं. आज आंदोलनाचा पाचवा दिवस होता. या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारने हैदराबाद संस्थान लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी जिंकलो रे राजे हो आपण तुमच्या ताकदीवर असे उद्गार काढले आहेत.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर आज मराठा उपसमितीच्या सदस्यांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर आता राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेत बडे निर्णय घेतले आहेत.
“एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जीआर दिला तर ९ वाजता मुंबई खाली होईल. नाचत नाचत पोरं गावाकडे जातील. तुम्ही थांबा म्हटलं तरी थांबणार नाही. तुम्ही जीआर द्या. आम्ही तुमच्या स्वागताला तयार राहू. तुम्ही इथेच बसून राहा आणि जीआर घेऊन या. सरकारला हा म्हणू का. ओके जिंकलो रे राजे हो आपण, तुमच्या ताकदीवर. आज कळालं गरिबांची ताकद किती मोठी आहे” असे मनोज जरांगे यांचे पहिले उद्गार होते.














