ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

५० वर्षांनी भेटलेल्या मित्र मैत्रिणींनी दिला स्नेहसंमेलनातुन आठवणींना उजाळा !

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मैत्री हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय असतं. जीवनाचा प्रवास हा न थांबणारा आहे. परंतु प्रत्येकाच्या जीवनातील आठवणी हा त्याच्या जीवनातील महत्त्वाचा ठेवा असून शालेय आठवणी हा तर अनमोल ठेवा असतो.पन्नास वर्षांपूर्वी एकत्र खेळले बागडलेले अनेक विद्यार्थी एकत्र आल्याने त्यांनी पन्नास वर्षांपूर्वीचे जीवन अनुभवले हा एक अद्भुत सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

वाल्हे येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीं पन्नास वर्षांनी एकत्र येऊन सुवर्ण महोत्सवी स्नेही मिळावा साजरा केला.

या स्नेह मेळाव्याचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश निगडे होते. शिक्षक एस. आर. माने व व्ही. एस. चौधरी उपस्थित होते. माजी विक्रीकर उपआयुक्त दशरथ भुजबळ, विनय शहा, सुदाम शिंदे, चंद्रकांत राऊत, बेबी कुदळे, सुरेखा ढावरे, कोयना पाटणकर, माजी सहाय्यक पोलिस फौजदार मारुती पवार, शिरीष नवले, उपसरपंच मोहन पवार, अशोक राऊत, विजया माने, श्रावण यादव, मंगल ठाकूर, बी. आर. नलगे उपस्थित होते.

१९७५ सालची जुनी अकरावी पास झालेले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी (रविवारी दिनांक 24) विद्यालयाच्या प्रांगणात एकत्र येऊन विद्यार्थ्यांनी तब्बल ५० वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहसंमेलन साजरे केले. दिलीप भुजबळ, माजी अप्पर पोलिस आयुक्त विजयसिंह
जाधव, दत्ता पवार, दशरथ भुजबळ आदी विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधून कार्यक्रमास येण्याच्या आव्हान करण्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू होते.

आपण कितीही मोठया पदावर गेलो तरी आपण ज्या शाळेत शिकलो तेथील आठवणी आपण आयुष्यभर विसरत नाही. आतातर सोशल मिडीयाचे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याने शाळेतील आठवणी अनेकदा ताज्या होत असतात आणि शाळेतील मित्रसुध्दा या माध्यमातून संपर्कात असतात. शाळेची इमारत पाहताच त्यांना आपल्या जुन्या इमारतीतील दिवस आठवले.

५० वर्षांनंतर आपल्या बालपणातील शाळेतील दिवस पुन्हा अनुभवायला मिळणे ही सर्वात मोठी आणि आनंदाची बाब आहे. असं म्हणतात कि बालपण गेलं कि पुन्हा मिळत नाही. मात्र आजच्या डिजिटल युगामुळे हे शक्य झाले आहे. सोशल मीडियाचा आधार घेत ५० वर्षानी पुन्हा एकदा बालपण जगण्याची संधी आता प्रत्येकाला मिळत आहे. १९७५ नंतर पुन्हा एकदा एकमेकांना भेटून आठवणींना उजाळा देताना या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम वारंवार साजरा करून एकमेकांनी बालपणीचे दिवस पुन्हा जगण्याचे या कार्यक्रमातून ठरविण्यात आले आहे.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक भान दाखवत विद्यालयासाठी आधुनिक साउंड सिस्टीम भेट दिली. माजी अप्पर पोलिस आयुक्त विजयसिंह जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर दत्तात्रय पवार यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप भुजबळ यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button