Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – सध्या गो-धनातील गायी-म्हशींमध्ये वाढत असलेल्या लंपी रोगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

चिखली कुदळवाडी व बालघरे वस्ती येथे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक दिनेश यादव यांच्या पुढाकाराने लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत पशुवैद्यकीय अधिकारी श्री. संदीप खोत आणि अरुण दगडे यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत लंपीपासून जनावरांचे संरक्षण कसे करावे याची माहिती देण्यात आली. जनावरांना संसर्ग होण्याआधीच लसीकरण करून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यावर भर देण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे जनावरांच्या आरोग्याचे रक्षण होणार असून शेतकऱ्यांमध्ये रोगाबाबत जागरूकता वाढत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version