ताज्या घडामोडीपिंपरी

कुदळवाडी शाळा क्र. ८९ चा भव्य कलाविष्कार उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल कुदळवाडी शाळा क्र. ८९ येथे आज दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी भव्य कलाविष्कार कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध उपक्रमांतून केलेल्या प्रगतीचे दर्शन या मंचावरून घडले.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर  राहुल जाधव यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल बोलताना त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक  संपत पोटघन व शिक्षकवर्गाचे विशेष कौतुक केले. महानगरपालिकेतील इतर शाळांमध्ये आदर्श कामगिरी करणारी संस्था म्हणून कुदळवाडी शाळेने स्थान मिळवल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाला नगरसेवक  दिनेश यादव,  युवराज पवार,  निशा यादव,  मनिषा पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  कविता निकम,  संभाजीराव व प्रदीप बालघरे, डॉ. सुनिल यादव,  ईश्वरी मोरे, शिक्षक संघाचे अध्यक्ष  संजय येणारे तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

कलाविष्कारासाठी झालेल्या प्रचंड गर्दीचा विचार करून सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी एल.ई.डी. स्क्रीनची व्यवस्था नगरसेवक मा. दिनेशशेठ यादव यांनी उपलब्ध करून दिली, याबद्दल पालकांनी विशेष समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमातील कलाकृतींनी प्रेक्षकांची मने जिंकली. श्री. खामकर सरांनी ‘अंबाबाईचे जोगवा’ याचे प्रभावी विवेचन करीत प्रेक्षकांना जणू देवीचे साक्षात दर्शन घडविल्याचा भावनिक अनुभव दिला. याशिवाय शिवाजीचा पाळणा, कॉमेडी डान्स, लल्लाटी भंडार, गुलाबी शरारा यांसारख्या सादरीकरणांना प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक  संपत पोटघन यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शिस्तीचे व सृजनशीलतेचे कौतुक करत सर्व शिक्षकवर्ग आणि कर्मचार्‍यांचे मनःपूर्वक आभार मानले.

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरणे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेला पाठिंबा यामुळे कुदळवाडी शाळेचा कलाविष्कार अविस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button