नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्रासाठी १५ लाखांचा विमा उतरवला – दिनेश यादव यांचा सामाजिक जाणिवेचा अभिनव उपक्रम!

कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – धार्मिक श्रद्धा आणि जैवविविधतेचा संगम असलेल्या नागपंचमीच्या पवित्र दिवशी समाजहिताचे भान ठेवत, स्वी सदस्य श्री. दिनेश यादव यांनी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. त्यांनी सर्पमित्रासाठी तब्बल १५ लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवून पर्यावरणाच्या खऱ्या रक्षकांची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे.
सर्पमित्र हे पर्यावरण रक्षणात मोलाची भूमिका बजावतात. ते सर्पमुक्ती करताना सापांचे प्राण वाचवतात आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात परत सोडतात. मात्र, हे करताना त्यांच्या जीवाला मोठा धोका असतो. भारतात आढळणाऱ्या सुमारे २५० सर्प प्रजातींपैकी ५० विषारी असून, कोब्रा, रसेल वायपर, क्रेट, सॉ-स्केल्ड वायपर यांसारखे जीवघेणे साप त्यांना रोजच सामोरे जावे लागते.
“सर्पमित्र समाजासाठी एक अमूल्य सेवा बजावतात. त्यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून त्यांना आर्थिक व सामाजिक संरक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे,”
असे दिनेश यादव यांनी सांगितले.
सध्या अनेक ठिकाणी अंधश्रद्धेमुळे साप मारले जातात, परंतु सर्पमित्र यांचं कार्य या चुकीच्या मानसिकतेला बदलण्यासाठी दिशादर्शक ठरतं.
यावेळी सर्पमित्र विशाल लोंढे,विशाल पांचुदे,ओमकार देशमाने यांचा गौरव करण्यात आला
दिनेश यादव यांचा हा प्रथमदर्शनी एकट्यापुरता वाटणारा उपक्रम, भविष्यात समाजात पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक जाणीवा निर्माण करणारा ठरेल, अशी सर्वांची भावना आहे.
या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतरांसाठीही तो आदर्श ठरत आहे.यावेळी उपस्थित स्वी सदस्य दिनेश यादव,सुरेश गंगणे,अँड विशाल डोगंरे,शिवराज लांडगे, प्रविण टिंगरे,प्रकाश चौधरी, नवनाथ जगताप हे उपस्थित होते















