ताज्या घडामोडीपिंपरी

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या विविध शाखांची स्थापना

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यांमध्ये फेरीवाला घटकासाठी काम करणारी संघटना नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या संघटना बांधणीला गती आलेली असून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये शाखा स्थापना सत्र सुरू आहे याचाच भाग म्हणून कृष्णानगर ,चिंचवड आणि चिखली परिसरामध्ये ३ शाखा चे ज्येष्ठ विक्रेत्यांचे हस्ते श्रीफळ फोडून आणि हार घालून आज उद्घाटन करण्यात आले. मोठ्या जल्लोषात विक्रेत्यांनी घोषणा देत शाखेची स्थापना केली आणि सभासदांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.

याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, पथ विक्रेता समिती सदस्य अनुक्रमे राजू बिराजदार,किरण साडेकर, सलीम डांगे, किसन भोसले,अलका रोकडे, यांचे सह फ क्षेत्रीय अध्यक्ष बालाजी लोखंडे,राजू खंडागळे, नितीन सुरवसे, युनूस पटवेकर,महादेव गायकवाड,इम्तियाज पठाण , सागर ठोंबरे,कमल मेटकरी, भाग्यश्री भोसले,दादा भानवसे, पोपट करे,बाळासाहेब शेगडे, शंकर पवार,मनोज खंडागळे,विकास शहा,मनोज बदाम, राहुल चव्हाण, पंढरीनाथ क्षीरसागर,मारुती इंदलकर, भैरूलाल आहेर, महेश शेळके,धर्मा मुंडे, नितीन काकडे,चतुर्भुज गायकवाड, सचिन खोडवे,जलाल गोलंदाज,बापू ओव्हाळ, मारुती बिराजदार ,सुग्रीव नरवटे, कृष्णा हजारे, यांचे सह पथ विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले की कृष्णानगर , चिंचवड आणि चिखली परिसरातील विक्रेत्यांसाठी योग्य जागेची निवड महानगरपालिकेकडून करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू असून ज्या विक्रेत्यांनी सर्वेक्षणानंतर नोंदणी शुल्क चौदाशे रुपये भरलेले नाही अशाने त्वरित भरून घ्यावे हॉकर झोनच्या जागा निश्चितीमध्ये महासंघ आणि महानगरपालिका सकारात्मक विचार करीत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पथ विक्रेत्यांचा संघटनेत वाढता सहभाग हा आमच्या सामूहिक जबाबदारीचा महत्वाचा भाग आहे आणि आम्ही हक्कासाठी लढतच राहणार आहोत.

बिराजदार म्हणाले या संघटनेत सहभागी होऊन नाम फलक स्थापना केल्याबद्दल आणि समूहामध्ये चांगला निर्णय आपण घेतला आहे त्याबद्दल आपले अभिनंदन .
स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक रहावे कचऱ्याचे निराकरण करावे असे आवाहन महासंघाकडून करण्यात आले प्रास्ताविक बालाजी लोखंडे यांनी तर आभार लाला राठोड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button