कोकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेचा रविवारी स्नेहमेळावा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेचा स्नेहमेळावा रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 सायंकाळी 4 ते रात्री 10 यावेळेत आचार्य आत्रे सभागृह, संत तुकारामनगर येथे होणार आहे.
यावर्षी संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्ष असून या स्नेहमेळाव्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेत व डायमंड पब्लिकेशनचे चेअरमन दत्तात्रय पाष्टे, कॉग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेविका निर्मलाताई कदम, विजया सुतार, अश्विनी जाधव उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी महिलांसाठी हळदी कुंकु, लहान मुलांचे तसेच महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, दहावी, बारावी तसेच विविध परिक्षांमध्ये उतीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे.तरी सर्व कोकण खेड तालुका अठरागांव विभागतील सर्व रहिवाशांनी या कार्यक्रमाला मोठ्या उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी केले आहे.








