शरदनगर स्पाईन रोडवरील स्वामी विवेकानंद भुयारी मार्गात चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करावा – सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील कृष्णानगर प्रभागात वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शरदनगर स्पाईन रोड स्वामी विवेकानंद भुयारी मार्गात चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव पालिका प्रशासन व वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुयारी मार्गाच्या समस्यांवर नागरिकांची नाराजी शरदनगर, घरकुल, कोयनानगर, महात्मा फुले नगर, शिवाजी पार्क या परिसरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून स्वामी विवेकानंद भुयारी मार्ग बांधण्यात आला. मात्र, पूर्ण झाल्यानंतर लगेचच तो अपयशी ठरल्याच्या चर्चांना उधाण आले.
विशेषतः पावसाळ्यात या ग्रेड सेपरेटरमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. पाणी साचते, रस्त्यांचा निचरा नीट होत नाही आणि अपघाताचे प्रमाणही वाढते. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
चारचाकी वाहनांना बंदी, दुचाकींना वॉर्डन व्यवस्था कीर्ती जाधव यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले की, या भुयारी मार्गातून चारचाकी वाहनांना प्रवेश बंद केला पाहिजे. फक्त दुचाकी वाहनांसाठीच मार्ग खुला ठेवण्यात यावा आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी वॉर्डनची नेमणूक करावी. या मागणीला स्थानिक नागरिकांचा आणि विविध सामाजिक संघटनांचा पाठींबा लाभलेला आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन लोकशाहीर, जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने हे निवेदन अधिकृतपणे पालिका प्रशासन व वाहतूक विभागाकडे देण्यात आले. यावेळी अध्यक्ष मारुती जाधव, दत्तात्रय धरमे, अभी जाधव, विशाल गरड, रोहित गरड, कुणाल पळसकर, सेफ खान, अक्षय ओहोळ, तेजस कडलक तसेच घरकुल शरदनगर परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.















