“पूरग्रस्तांची दिवाळी झाली गोड — आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्ती जाधव युथ फाउंडेशनचा उपक्रम”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्ती मारुती जाधव युथ फाउंडेशन तर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी “एक हात मदतीचा” हा उपक्रम राबवण्यात आला.
या अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील मौजे लाखी गावात पूरग्रस्त नागरिकांना दिवाळी फराळ व किराणा किटचे वाटप करण्यात आले.
फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गावातील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून स्थानिकांना धीर दिला. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी आणली.
या उपक्रमात कीर्ती जाधव यांनी सांगितले की, “आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आणखी मदतीचे कार्य लवकरच हाती घेतले जाईल,” असे आश्वासन देऊन लोकांना मानसिक बळ दिले.
या उपक्रमात कीर्ती मारुती जाधव फाउंडेशन व त्यांचे कुटुंब, सरपंच दादा बारस्कर, पोलीस पाटील नारायण पाटील, निवृत्त मेजर मनोहर रामलिंग पिंगळे, दादा पिंगळे, अनिल ढवळे, अंगद बारस्कर, ज्ञानेश्वर उमाप, कुणाल पळसकर, अभी जाधव, दत्ता धर्मे, आशिष हिंगे, सुशांत आवाळे, संतोष जाधव, गणपत जाधव यांच्यासह संपूर्ण गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी गावातील सरपंच दादा बारस्कर, पोलीस पाटील नारायण पाटील व ग्रामस्थांनी कीर्तीताई जाधव फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.
गरजेच्या वेळी मदतीचा हात दिल्याबद्दल समस्त गावकऱ्यांनी भावनिक वातावरणात आभार मानत फाउंडेशनच्या टीमला निरोप दिला.
—













