ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर भाजपने त्वरित कारवाई करावी – काशिनाथ नखाते

Spread the love

 

मंगरूळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतीय जनता पक्षाचे (भाजप) मंगरूळचे आमदार बबनराव लोणीकर यांनी एका भाषणात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. लोणीकर यांनी आपल्या भाषणात मतदारांवर उपकाराची भाषा वापरत अहंपणाचा दृष्टिकोन दाखवला, ज्यामुळे त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी लोणीकर यांनी जगाच्या पोशिंदाची माफी मागावी आणि पक्षाने त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोणीकर यांनी आपल्या भाषणात म्हटले, “येथे बसलेल्या कार्ट्याच्या कुटुंबाला आम्हीच पैसे दिले, तुमच्या बापाला पेरणीचे पैसे आम्ही दिले, माईचा पगार, बापाची पेन्शन मी दिली. नरेंद्र मोदींनी ६ हजार तुझ्या बापाला पगार दिला, तुझ्या आईला, बहिणीला, बायकोला, लाडक्या बहिणीचे मी दिले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्यामुळे, तू घातलेला बूट आमच्यामुळेच, तुमच्या हातातलं मोबाईल डबडं आमच्यामुळेच आहे.” अशा स्वरूपाचे अत्यंत संतापजनक वक्तव्य आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे.

कामगार नेते काशिनाथ खाते यांनी यावर तीव्र आक्षेप घेत म्हणाले, “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि समाजात त्याला मान आहे. परंतु, जनतेच्या मतांवर निवडून येणारे आमदार सत्तेच्या मस्तीत अशी भाषा वापरतात, याचे बबनराव लोणीकर हे उदाहरण आहे. जनतेच्या मतांवर निवडून येणाऱ्या आमदारांनी मतदारांचा आदर करायला हवा. लोणीकर यांच्या या मग्रुरीच्या आणि आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजपने त्वरित कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रातील जनता त्यांना रस्त्यावर जोडी मारल्याशिवाय राहणार नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले की, लोणीकर यांनी मतदारांना उद्देशून वापरलेली ही भाषा लोकशाहीच्या मूल्यांविरुद्ध आहे. “निवडून येणारे आमदार हे जनतेचे सेवक असतात, त्यांच्यावर उपकार लादणारे नाहीत. लोणीकर यांच्या या वक्तव्याने त्यांचा अहंकार आणि सत्तेची मस्ती स्पष्ट होते,” असे नखाते यांनी नमूद केले. लोणीकर यांच्या या वक्तव्यामुळे जनतेत आणि राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button