ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

बांधकाम कामगारांना ५ हजार दिवाळी बोनससह इतर लाभ द्या मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे मुंबईत केली मागणी

Spread the love

 

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध २८ योजना राबविण्यात येत आहेत तर काही योजना थांबल्या आहेत त्याही मिळाव्यात. आणि महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण महामंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे त्यास निधी देऊन कार्यान्वित करावे आणि बांधकाम कामगार ,घरेलु कामगार यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीचे अध्यक्ष सागर तायडे,कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मंत्रालय मुंबई येथे कामगार मंत्री यांची भेट घेऊन निवेदन व चर्चेद्वारे केली.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, मनोज यादव, लाला राठोड उपस्थित होते.

कामगार वर्ग वर्षभर राबत असतो. कारखाने स्थापनेत दिवाळी बोनस मिळते त्यातून त्यांना दिलासा मिळतो मात्र कष्टकरी कामगार यांना बोनस मिळत नाही त्यांना दिल्यास त्यांची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होणार आहे. कोरोना काळात असंघटित कामगार यांना अनुदान दिले होते याचे स्मरण करून देत कष्टकऱ्यांच्या बोनस बाबत आपण सकारात्मक विचार करून त्वरित देण्यात यावे. आणि निवेदनाद्वारे पुढील महत्वाच्या मागण्यांवर पुढील मागण्यांवर तायडे व नखाते लक्ष वेधून फुंडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
१. सर्व असंघटित कामगारांना राज्य कामगार विमा ईएसआयसी सुरू करा
२ घरेलु कामगारांना लाभ देण्यासाठी १००० कोटींची तरतूद करावी.
३. कामगारांचे कामाचे तास ८ वरून आता १२ तास केले आहेत ते रद्द करण्यात यावेत.
४. बांधकाम कामगार पडताळणी संख्या दररोज ४० ऐवजी २०० करावी.
५. कामगारांना आवश्यक गंभीर आजारासाठी १ लाख रुपये अर्थसहाय्य द्यावे.
६.आवास योजनेच्या अंतर्गत अनेक कामगारांच्या घरांसाठी २ लाख त्वरित अनुदान सुरू करावे .
आदी मागण्यांवर निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावर त्यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ तसेच इतर मागण्या सोडवण्याबाबत सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button