ताज्या घडामोडीपिंपरी

कर्मवीर भाऊरावांमुळेच सुसंस्कृत शिक्षणाचा पाया – काशिनाथ नखाते

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेतकरी,कष्टकरी, कामगारांच्या गरीब मुले शिक्षण घेणे शक्य नव्हते, दूर दूरवर शाळा नव्हत्या अशा काळात बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी कमवा व शिका योजनेद्वारे गरीब विद्यार्थ्यांना स्वावलंबी करून उच्च शिक्षण घेण्याचे पथदर्शी नियोजन राजर्षी शाहूंच्या विचाराचा प्रभाव असणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले आणि यामुळे महाराजा सयाजीराव मोफत व निवासी रूपात१०१ हायस्कूल निर्माण करून शिक्षणाचे द्वारे खुले करून सुसंस्कृत शिक्षणाचा पाया रोवला असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांचे वतीने आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, ओमप्रकाश मोरया, किरण साडेकर,राजश्री साळुंखे, ज्योती पवार, प्रतिभा माळी, महानंदा बगाडे, प्रियांका वाडेकर, कोमल यादव, सुनील गायकवाड, रवी कांबळे ,राजाराम गोंगे, नागप्पा चक्रवर्ती, सुनील जाधव, जावेद शेख, समाधान पोतराज आदी उपस्थित होते.

विद्यार्थी, शिक्षण,घडणारा समाज यावर अतिशय स्पष्ट व आजही मार्गदर्शक ठरतील असे मौलिक विचार आहेत, शिक्षणातून नवचैतन्य नव संस्कृती आणि नवीन समाज जन्माला येतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. तर शिक्षक हा ग्रामीण भागांचा खेड्यांचा आदर्श ग्रामसेवक आणि प्रभावी ग्रामनायक असावा असे ते नेहमी म्हणत असत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अन्याय, विषमता, अत्याचार विरोधात दंड थोपटले १९१९ ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून खेडोपाडी , गावोगावी प्राथमिक शाळांचे जाळे उभारले याची संख्या ५३८ पर्यंत पोहोचवली असे मत नखाते यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button