ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड मध्ये सुसज्ज हॉकर झोनसाठी प्रयत्नशील – काशिनाथ नखाते

पुणे येथील पहिल्या हॉकर्स पार्कची पाहणी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पथारी, हातगाडी, स्टॉलधारक, फेरीवाला यांच्यासाठी सुसज्ज असा आणि राज्यात आदर्श ठरेल असा सुनियोजित हॉकर्स पार्क पंचशील फाउंडेशन तर्फे पुणे शहरात बनवण्यात आला आहे, याची महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे शिष्टमंडळ व पथ विक्रेता समिती सदस्यांनी आज पाहणी केली. नवीन संकल्पनेतून हॉकर्स पार्क पिंपरी चिंचवड मध्ये साकारण्यासाठी महासंघ आणि समिती सदस्य प्रयत्न करतील असा विश्वास कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, किसन भोसले, लाला राठोड यांचे सह राजेश माने, सलीम शेख,ओमप्रकाश मोरया, उपस्थित होते.

पुणे खराडी येथे पथ विक्रेत्यांसाठी समर्पित विक्री क्षेत्र असे बनवण्यात आले असून १२० फेरीवाल्यांना यात सामावले जाणार असून भाजीपाला, फळे विक्री सह खाद्यपदार्थ विक्री सह इतर सेवा व दुरुस्ती व्यावसायिकांना सामावून घेण्यात येणार आहे.

सदरचे ठिकाणे ५० चार चाकी व १५० दुचाकी वाहन तळासाठी सुविधा करून देण्यात आलेली असून शिपिंग कंटेनरचा पुनर्वापर करत स्टॉल आकर्षक डिझाईनसह बनवण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पथ विक्रेता समिती अध्यक्ष व सदस्य यांचे माध्यमातून जागांची पाहणी सुरू असून ६४ ठिकाणी हॉकर्स झोन निर्माण करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात मनपा आयुक्त शेखर सिंह तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू असून लवकरच हॉकर झोनसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button